
चित्रा कापसे/तिरोडा- आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यात स्थानिक नावाजलेल्या शहीद मिश्रा विद्यालयातील 339 मधून 330 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.३४ टक्के लागला. यात प्रथम क्रमांक कुमारी अवंतिका किरण कुमार गोबाडे हिने पटकवले असून तिला 94.20% गुण प्राप्त झाले. तसेच द्वितीय क्रमांक मंथन हंसराज ठाकरे यांनी प्राप्त केले असून याला 93.60% गुण प्राप्त झाले तर तिसऱ्या क्रमांकामध्ये कुमारी प्रिया दलितकुमार चव्हाण हिला 93.20% गुण प्राप्त झाले. शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्रजी झरारिया उपाध्यक्ष संजीवजी कोलते सचिव उमाकांतजी हारोडे, शाळेचे प्राचार्य विकास बारापात्रे उपप्राचार्य श्रीमती सीमा भाजीपाले, पर्यवेक्षक टिकारामजी पटले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.