पी.डी.राहांगडाले विद्यालय यशाची परंपरा कायम

0
78

गोरेगाव,दि.१३ः-येथील पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या इ. 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. तसेच तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा निकाल 80% लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
त्यामध्ये ” प्रिती भूषण राहांगडाले 95.00% गुण मिळवत तालुका मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, गौरव देवेंद्र कटरे 77.20% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला,आणि वैशाली परमानंद मांढरे 76.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना यश मिळाले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी पी येडे, सचिव एड टी बी कटरे, संचालक यु टी बिसेन,महाविद्यालयाचे प्राचार्य सी डी मोरघडे, पर्यवेक्षक ए एच कटरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पी. डी. राहांगडाले विद्यालयाने याआधीच्या वर्षी देखील उल्लेखनीय निकाल देत सातत्याने गुणवत्तेचा उच्च स्तर राखला आहे.