
गोंदिया :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारे घेण्यात आलेल्या वर्ग 10 वी चा निकाल जाहीर झाला असून श्रीमती विमालताई विद्यालय व , विज्ञान MCVC कनिष्ठ महाविद्यालय कटंगी नाका. विद्यालयाने निकालची परंपरा कायम राखून उत्तुंग यश मिळविले. विद्यालयाचा एकूण निकाल 100% लागला असून कु. तस्लिम अकिल खान 93.20% प्रथम, कु. निकिता विजय बावनकर 84.00%द्वितीय तर कु. चैताली उमेश हिरापुरे 77.20% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.
एकूण 90 विद्यार्थ्यांपैकी प्रविण्या श्रेणीत 07′ प्रथम श्रेणी 13,द्वितीय श्रेणी 51, तर तृतीय श्रेणी12,विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माननीय संस्था अध्यक्ष श्री जे. एस. रहांगडाले साहेब, सचिव श्री एन. एन. येळे साहेब, प्राचार्य डॉ. मनोज एल. रहांगडाले,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय समित्यांचे सर्व पदाधिकारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले