आश्रम शाळा पुराडा येथील एसएससीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा राखली कायम

0
87

मुलींच प्रथम पाच गुणानुक्रमे

देवरी–नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या निकालात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडाने याही वर्षी बाजी मारली असून एसएससी चा निकाल 100% लागला असून दरवर्षीची परंपरा या वर्षीही कायम राहिलेली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथील एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी पुर्ण च्या पुर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३ विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त, ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत,याविषयी बोलताना शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले की माजी अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी भविष्य वेधी व इतर शिक्षणपद्धतीचा अवलंब अतिशय प्रभावीपणे आश्रम शाळांमध्ये राबविल्याचे हे फलित असल्याचे सांगितले.
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे हे विशेष,या यशाबद्दल स्थानिक आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद सदस्या सवीताताई पुराम,प.स.सदस्या ममताताई अंबादे,प.स.सदस्या वैशालीताई पंधरे, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद,पुराडाचे सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम, ढिवरीनटोला चे सरपंच दिलीप जुळा, पोलिस पाटील सुभाष अंबादे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे, वर्ग शिक्षक विलास लिल्हारे,सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून शाळेत प्राचार्य कमल कापसे यांनी प्रथम तिन क्रमांक पटकाविलेल्या वैदेही बैस, गायत्री हत्तीमारे, ज्योती उईके यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.