नंगपुरामुर्री निवासी शाळेचा शंभर टक्के निकाल…

0
24

प्रावीण्य श्रेणीत १४ : १२ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

गोदिंया :तालुक्यातील नंगपुरामुर्री येथील वर्ग दहवीचे विद्यार्थी सर्वच उत्तीर्ण झाले असून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे प्रावीण्य श्रेणीत १४ तर १२ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.शाळेतून सावन बळीराम जाधव हा शाळेतून प्रथम आला असून ८६.०० तर द्वितीय योगेश डोंगरे ८५.६० तसेच अनामिक दुर्योधन याला ८५.२० टक्के घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा राखून ठेवली.यशाचे श्रेय आईवडिलांना देऊन शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले, वर्गशिक्षक नीता भलमे, मुन्नाभाई नंदागवळी, अस्मिता तेलंग, प्रदीप ढवळे, साधना पारधी व तुषार महाजन यांनी अथक परिश्रम घेतले आहे.