राज्यातील 49 शाळांचा शून्य निकाल

0
17

मुंबई — महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्‍या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.71 टक्क्यांनी घटला आहे. लातूर पॅटर्नची पोलखोल झाली असून दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. राज्यात अशा 49 शाळांना भोपळा फोडता आला नाही.यंदा एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32 गुणांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, तर सर्वात कमा निकाल हा गडचिरोरील जिल्ह्यात आहे. 82.67 टक्के निकाल या जिल्ह्याचा आहे. याशिवाय राज्यातील 49 शाळांमधील निकाल हा शून्य टक्के राहिला आहे. ही एक चिंता वाढवणारी बाब आहे. तसेच 285 विद्यार्थी हे काटावर पास झाले आहेत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळाले आहेत.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 68 हजार 582 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

35 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
मुंबई: 67 विद्यार्थी
नागपूर: 63 विद्यार्थी
पुणे: 59 विद्यार्थी
संभाजी नगर: 28 विद्यार्थी
अमरावती: 28 विद्यार्थी
लातूर: 18 विद्यार्थी
कोल्हापूर: 13 विद्यार्थी
नाशिक: 9 विद्यार्थी
कोकण: 0 विद्यार्थी
49 शाळांचा निकाल शून्य टक्के आहे, त्या शाळा खालीलप्रमाणे
>लातूर: 10 शाळा

संभाजी नगर: 9 शाळा
नागपूर: 8 शाळा
पुणे: 7 शाळा
मुंबई: 5 शाळा
अमरावती: 4 शाळा
नाशिक: 4 शाळा
कोल्हापूर: 1 शाळा
कोकण: 1 शाळा

पुणे जिल्ह्याने निकालांत 97.26 टक्के मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ७ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. तर पुणे विभागात 59 विद्यार्थ्यांना केवळ 35 टक्के गुण मिळाले आहेत.