मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथील विद्यार्थ्यांनी एस एस सी परीक्षेत यशाची परंपरा राखली कायम

0
37

गोरेगांव :- मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथील विद्यार्थ्यांनी एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत एकूण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 28 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त सूची मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. कु. तृप्ती विजयकुमार दानी 92.80. टक्के घेऊन शाळा प्रथम, कु. निधी राहुल कटरे 92.00 टक्के घेऊन शाळा द्वितीय, भार्गव संतोष ठाकूर 91.20 टक्के घेऊन शाळा तृतीय क्रमांक घेतला आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे संस्था सचिव आर. डी. कटरे, वैभव आर.कटरे संचालक, मुख्याध्यापक सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षक एस.डी.चिचामे,आर.बी.कांबळे, आर.बी.कोल्हे, धनंजय बहेकार, सौ.कोमलता पटले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. त्याचबरोबर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, संस्था संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, सर्व शिक्षकवृंद व आपल्या आई वडिलांना दिले.