कठोर परिश्रम व सततचा सराव केल्यास यश प्राप्त होतो-पंकज चौधरी

0
18

भिरावमजी विद्यालय वडेगाव ने राखली यशस्वी विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा कायम.
तिरोडा-केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्षभर जर कठोर प्रयत्न केले आणि सतत सराव केला तर यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन प्रतिभा शिक्षण संस्थेचे सचिव पंकज चौधरी यांनी भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना बोलून दाखवले . हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संस्था सचिव पंकज चौधरी यांचे हस्ते प्राचार्य डी आर गिरीपुंजे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वर्ग दहावी मधील 90% पेक्षा जास्त गुण घेऊन विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम ठेवली त्यात प्रथम कृपांशू दिगंबर बोपचे 92. 60, द्वितीय आरुषी अरुण तुरकर 90.40 ,समृद्धी अनिल बोपचे 90.40 ,तर तृतीय वंशदीप जितेंद्र बोरकर 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले व आपल्या विद्यालयाची परंपरा कायम ठेवली.
प्राचार्य डी आर गिरीपुंजे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे गुणगौरव करून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या असेच गुण प्राप्त करून इतर विद्यार्थ्यांनीही पुढे आपली यशाची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन केले तर ज्येष्ठ शिक्षक जी एन बीसेन ,जी जे मेश्राम, आर एस मेश्राम ,आर के किरसाण ,डी एस बोदेले बी पी भारतकर विनोद आर धावडे ,ए एम टेंभेकर ,संगीता वालदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
कार्यक्रमाचे संचालन डी एस बोदेले, प्रास्ताविक प्राचार्य डी आर गिरीपुंजे तर आभार प्रदर्शन गोविंदप्रसाद बीसेन यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.