मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथे उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न

0
16

गोरेगांव – स्थानीय मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन 2 ते 17 मे या दरम्यान घेण्यात आले. या शिबिर मध्ये एकूण 150 च्या वर विद्यार्थ्यांना योगा, इंग्रजी, हसलेखन, नृत्य, व खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला यशस्वी करण्याकरिता योग प्रशिक्षक पुरुषोत्तम साखरे, हस्तलेखन विजय गावराने, स्पोकन इंग्लिश धनंजय बहेकार, रमेश कोल्हे, कोमल रहांगडाले, चेतना खोब्रागडे यांनी सहकार्य केले. उन्हाळी शिबिरात सहकार्य केल्याबाबाद सर्व प्रशिक्षकांचे संस्था मार्फत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर, उत्कृष विद्यार्थी निवडून त्यांना पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. संस्था सचिव आर. डी. कटरे यांच्या सानिध्यात संचालक वैभव आर.कटरे यांनी शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाचे माध्यमातून संस्था सचिव आर.डी.कटरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिबिरात घेतले प्रशिक्षण निरंतर सुरू ठेवण्याबद्दल सांगितले.