
अखेर युवकांच्या पथक परिश्रमातून सुरू झाली गोरगरिबांची शाळा
अर्जुनी-मोर- हल्ली युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. विवाह सोहळे वाढदिवस आणि विशेषतः होळीच्या सणाला डीजेच्या तालावर नाचून प्राधान्याने मद्य घेण्याची परंपरा असतेच परंतु या परंपरेला फाटा देत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथे युवकांनी गरीब फाउंडेशन संघटनेच्या व्यासपीठाखाली एकत्र येत शिमगोत्सवातून जमा झालेला पैसा मटन पार्टी अथवा व्यसनात व्यर्थ खर्ची न करता धनदांडग्या श्रीमंत मुलांना मिळत असलेला कॉन्व्हेंटचे शिक्षण आपल्या गावातील ही गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाव यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतच पूर्व प्राथमिक (कॉन्व्हेंट) समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. या युवकांचा हा आदर्श प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
जवळील बोंडगाव सुरबन येथे ता. ०३ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट ) च्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार शिवसेना जिल्हाप्रमुख शैलेश जायसवाल, उपसभापती संदीप कापगते, भिवाजी मलगाम, देवराम हलमारे, हेमराज मानकर, पुरुषोत्तम चोरवाडे, मार्कंड चोरवाडे, दिलीप सयाम पो.पा.मनोज मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष गोवर्धन राऊत, ग्रामसेवक टीकाराम जनबंधू सुशीला हलमारे, नारायण हटवार, संचित वाढवे, सरपंच पुष्पाताई डोंगरवार, धनंजय हटवार, पुंडलिक ठलाल, हितेश हलमारे, नरेश बोरकर , रमेश बोरकर, राजेंद्र मारबते, शिवकुमार गोदेले, धनराज हर्षे, हिरालाल मानकर, उदाराम सयाम, सत्यशीला मडावी, किरण मानकर, रीना डोंगरवार, मीनाक्षी वंजारी, दीक्षा डोंगरवार, माधुरी सांगोळे, माया सयाम, मंजुषा हलमारे, कुंदा कोडापे, भास्कर दखणे, व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की स्थानिक युवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला गावातील नागरिक व शिक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे परिस्थिती आता बदलत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता खाजगी होणार, खाजगी शाळांना परवानगी दिली जाते असा भ्रम प्रसविला जातो. परंतु शासनाकडून असे कुठल्याही नवीन शाळेला परवानगी देण्यात आली नाही. पालकांनीही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे केवळ शासनावर अवलंबून राहता या युवकांप्रमाणेच गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षकांनीही केवळ वेतनापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे केवळ मैदानी खेळ नव्हे तर सांस्कृतिक बौद्धिक खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश सहारे, निखिल वाढवे, योगेश बोरकर, मनोहर मानकर, हितेंद्र शहारे, पंकज दरवडे, विलास हटवार, चेतन बोरकर, भोजराज मानकर, मुकेश नेवारे, राजेश मेश्राम, रुपचंद मानकर, समीर मेश्राम, टिंकू मेश्राम, हर्षल हटवार, आदी युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुरज डाखोळे यांनी तर आभार मुख्याध्यापक यशवंत शेंडे यांनी मानले.