
नागपूर,दि.१४ः नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्या नंतर विद्यार्थ्यांचे वर्ग लागल्या शिवाय परीक्षा द्यावी लागणार आणि NEP मुळे प्राध्यापकांचे शोषण या अन्यायपुर्ण विषयाला घेऊन तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगाराशिवाय झालेले हाल यावर सहसंचालकांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या केंद्र व राज्य शासनाच्या आणि विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रमात चारपटी पेक्षा जास्त Workload देण्यात आलेले आहे. यानुसार नागपूर विद्यापीठ सामाजिक विज्ञान शाखेतील सर्व विषयाचे अभ्यासक्रम आठवड्याला 80 ते 90 तर विज्ञान शाखेतील सर्व विषयाचे आठवड्याला Workload साधारण 140 ते 150 असे झालेले आहेत.
वाढलेल्या workload करीता आर्थिक मान्यता देऊन खर्चाचा अंदाज घेणे आवश्यक होते. वाढलेल्या workload प्रमाणे शिक्षक भरती बाबत आपल्या सूचना मागील वर्षातच निघणे आवश्यक होते.जुन्या शैक्षणिक धोरणा नुसार वर्ग निहाय विद्यार्थी संख्या निर्धारित असल्याने त्यांची विषय निहाय किमान व कमाल विद्यार्थी संख्या बाबत अध्यादेश निघणे आवश्यक होते.NEP नुसार वर्ग वाढल्याने त्याच प्रमाणात वर्ग खोल्या वाढविणे आवश्यक आहे. त्यावंबाबत महाविद्यालयांनी ते कसे करायचे याविषयीं अधिसूचना निघणे आवश्यक होते.या बाबत शासन स्तरावर अनास्था दिसून येते यात विद्यार्थ्यांच्या मोठे नुकसान होत असून प्राध्यापकांचे शोषण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इतर मागण्या
१. NEP नुसार वाढलेल्या workload ला आर्थिक मान्यता देऊन अंशकालीन प्राध्यापक करिता मान्यता देण्यात यावी.
२. A to K करिता आणि पद मान्यता करिता NEP नुसार workload मागविण्यात यावे.
३. समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मासिक वेतन HTE प्रणाली मार्फत ऑनलाइन पध्दतीने व्हावे मागील जुलै महिन्याचे रखडलेले वेतन करावे
४. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे DCPS , GPF खाते उघडून त्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा
५. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनुकंपा तत्त्वावरील रखडलेले किंवा काही उच्च शिक्षण संचालनालय पुणे इथे थांबलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावी
६. प्राध्यापकांचे स्थान निश्चिती / fixassion प्रकरण जास्तीत जात १५ दिवसांच्या आत निकाली काढण्यात यावे.
निवेदन देताना डॉ. ओमप्रकाश चिमणकर अध्यक्ष DBATO,डॉ. विकास जांभूळकर उपाध्यक्ष DBATO,डॉ.श्रीकांत मी. ब. भोवते सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ नागपूर व सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन नागपुर,डॉ. राहुल भगत DBATO जिल्हा अध्यक्ष -भंडारा,डॉ. विनोद राऊत DBATO जिल्हा अध्यक्ष -नागपूर शहर,डॉ. नितीन मेश्राम
DBATO जिल्हा अध्यक्ष -नागपूर ग्रामीन,डॉ. बुद्धघोष लोहकरे DBATO जिल्हा अध्यक्ष -वर्धा,डॉ. किशोर वासनिक
DBATO जिल्हा अध्यक्ष -गोंदिया,डॉ. प्रमोद लांजेवार DBATO अभियांत्रिकी व व्यावसायिक महाविद्यालय आदी उपस्थित होते.





