
गोरगाव,दि.०१- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथील विद्यार्थ्यांनीी आपल्या यशाची परंपरा कायम राखत एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये कु.सौंदर्या रामटेके,कु.सलोनी सयाम,कु.रिद्धि पटले,कु.सुहाना पटले या विद्यार्थीनींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शाळेचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या कष्टाला फळ व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक कृष्णकांत बिसेन,शिक्षक भारती कटरे,व्ही.एस.मेश्राम,पी.एफ.इळपाचे,सौ.एच.वाय.मोहणे,सौ.एम.एम.गणवीर,अनिता मेंढे यांनी विशेष घेतलेल्या परिश्रमाचा महत्वाचा वाटा आहे.उत्तीर्ण विद्यार्थीनीनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहे.





