नागपूर : शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत प्राची रामचंद्र पोगुलवार (गांगुलवार) यांनी इतिहास विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राची पोगुलवार यांनी “नागपूरकर भोसले यांची प्रशासन व्यवस्था – एक ऐतिहासिक अध्ययन (इ.स. १७३० ते १८५४)” या विषयावर सखोल संशोधन केले आहे. या अभ्यासामध्ये त्यांनी भोसलेकालीन प्रशासनाची रचना, कार्यपद्धती तसेच सामाजिक-आर्थिक परिणाम यांचा बारकाईने अभ्यास करून इतिहास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांनी हे संशोधन कार्य प्रा. डॉ. गोविंद तिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांचा शोधप्रबंध संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे सादर करण्यात आला होता. विद्यापीठाने त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता ओळखून त्यांना इतिहास विषयातील पीएच.डी. (आचार्य) पदवी जाहीर केली आहे.
प्राची पोगुलवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





