29.3 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home शैक्षणिक वर्ग ५ ते ८ चे माध्यमिक शाळेवरील शिक्षक अनेक वर्षापासून पदोन्नती पासून...

वर्ग ५ ते ८ चे माध्यमिक शाळेवरील शिक्षक अनेक वर्षापासून पदोन्नती पासून वंचित

0
14

गोंदिया,दि.०९- गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात अनेक पदोन्नत्या करण्यात आल्या.परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेवरील इयत्ता पाच ते आठला अध्यापन करणारे शिक्षक अनेक वर्षांपासून पदोन्नती पासून वंचित राहिल्याबद्दल शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे यांनी आज शिष्टमंडळासमोर खंत व्यक्ती केली.माध्यमिक शाळेतील इयत्ता पाच ते आठ ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांमधून अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षक व माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती देण्यात आलेल्या नाहीत.पवित्र पोर्टल मधून होणाऱ्या भरतीने येणारे शिक्षक जेष्ठ ठरवून कार्यरत शिक्षक हे सेवा कनिष्ठ ठरत आहेत. सेवाज्येष्ठ शिक्षकांना सहायक शिक्षकाची वेतनश्रेणी मिळत आहे व नव्याने रुजू होणारे शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळत असल्याची बाब शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याही लक्षात आणून देत लवकरात लवकर पदोन्नती देण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात प्रमोद पटले, टेकचंद गावडकर, मनीष कोल्हे ,वासनिक ,करसायल मॅडम यांचा समावेश होता.