29.3 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home शैक्षणिक न.मा.द. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुनिल जाधव यांना ‘पेटंट’

न.मा.द. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुनिल जाधव यांना ‘पेटंट’

0
12

गोंदिया,दि.०९ः-येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुनिल कुंडलिकराव जाधव यांना भारत सरकारकडून मानाचे ‘पेटंट’ प्रदान करण्यात आले आहे. त्यांनी ‘System for Integrating Economic Data Analytics into Public Administration Library Networks’ या संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत पॅटर्न मंजूर झाले आहे. हे संशोधन ग्रंथालय आणि माहिती शास्त्र क्षेत्रात ही एक महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.
​आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांचे स्वरूप बदलत आहे. डॉ. सुनिल जाधव यांनी विकसित केलेली ही प्रणाली सार्वजनिक प्रशासनातील ग्रंथालय नेटवर्कमध्ये आर्थिक डेटाचे विश्लेषण (Economic Data Analytics) समाकलित करण्यास मदत करते. या संशोधनामुळे ग्रंथालयांना केवळ माहितीचे स्त्रोत म्हणून न पाहता, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत डेटा-आधारित (Data-driven) अचूकता कशी आणता येईल, याचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच सार्वजनिक ग्रंथालय केवळ माहिती साठवणारी केंद्रे न राहता ज्ञान संशोधन आणि धोरण निर्मितीसाठी उपयुक्त अशी आधुनिक डिजिटल माहिती केंद्र म्हणून विकसित होण्यास या संशोधनाला मोठा हातभार लागणार आहे. अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांचा समन्वय साधणारे हे संशोधन शाश्वत विकास, सुशासन आणि प्रभावी निर्णय प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.
​डॉ. सुनिल जाधव यांना यापूर्वी ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयात दोन पेटंट भारत सरकारने मंजूर केले आहे. त्यांनी यापूर्वी सात पुस्तकांचे लेखन केले असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या संशोधनामुळे ग्रंथालय प्रशासनाच्या आधुनिकिकरणाला एक नवी दिशा मिळाली आहे.
​त्यांच्या या यशाबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन तसेच नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे , सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. सुनिल जाधव यांचे अभिनंदन केले आहे.