29.9 C
Gondiā
Tuesday, July 14, 2026
Home शैक्षणिक इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविणाऱ्या आश्रम शाळेत होणार ‘आनापान’ शिबीर

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविणाऱ्या आश्रम शाळेत होणार ‘आनापान’ शिबीर

0
7

गोंदिया, दि.14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविणाऱ्या जिल्ह्यातील आश्रम शाळेत ‘आनापान’ शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग गोंदिया आणि विपशना केंद्र ओझाटोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जुलै 2026 रोजी लक्ष्मणराव चंद्रिकापुरे माध्यमिक आश्रम शाळा घोटी येथे ‘आनापान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

         मुलांचा बौध्दिक विकास करणे, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, त्यांच्यावर चांगले संस्कार घडविणे, सुजान नागरिक घडविणे हा यामागाचा उद्देश आहे, असे विचार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी व्यक्त केले.

         शिबिराची सुरुवात सकाळी 9 वाजता करण्यात आली व दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना मंगल शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तीचे श्वास व मनाची अवस्था व त्यातून होणारे फायदे याबद्दल विविध सत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राहुल चंद्रिकापुरे, संतोष कुलकर्णी, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.