24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक गडचिरोलीत नशामुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; शिवाजी महाविद्यालय व ‘सर्च’च्या वतीने भव्य जनजागृती फेरी

गडचिरोलीत नशामुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; शिवाजी महाविद्यालय व ‘सर्च’च्या वतीने भव्य जनजागृती फेरी

0
7

 गडचिरोली: गडचिरोली शहराला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने येथील शिवाजी महाविद्यालय आणि ‘सर्च’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ऑगस्ट २०२६ रोजी एका भव्य ‘नशामुक्ती जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व हिरीरीने सहभाग नोंदवला.
या विशेष अभियानामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी दारू, खर्रा, ड्रग्स यांसारख्या घातक व्यसनांचे दुष्परिणाम व त्याबाबतची जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. नगरपरिषद ते गांधी चौक आणि शहरातील इतर विविध मुख्य मार्गांवरून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. यादरम्यान नशामुक्तीवर विविध घोषणा देत आणि नारे लावत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. गडचिरोली शहर नशामुक्त करण्यासाठी परिसरातील सर्व युवकांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले.
हा उपक्रम शिवाजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते व सर्च संस्थेच्या ‘निर्माण’ उपक्रमाचे प्रमुख डॉ.अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) प्रमुख डॉ. जे. जी. उईके व डॉ. विलास खुणे यांच्या पुढाकाराने, तसेच सहायक प्रा. वैभव म्हस्के आणि प्रा. जयंत लडके यांच्या मोलाच्या सहकार्याने हे अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने आणि सक्रिय सहभागामुळे या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला