गोरेगाव,दि.०५- शहारवानी येथील स्व. ब्रिजलालजी कटरे हायस्कूलमध्ये शिक्षक दिन, विद्यार्थी स्वयंशासन उपक्रम आणि गोपाळकाला निमित्त दहीहंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या दुहेरी सोहळ्यामुळे शालेय परिसरात कमालीचा उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय. कटरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे असणारे योगदान, गुरु-शिष्याचे नाते आणि केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जीवनात संस्कारांचे असणारे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि लोकशाही मूल्ये रुजावीत या उद्देशाने ‘विद्यार्थी स्वयंशासन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत शाळेतील विविध वर्ग सांभाळले आणि शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
गोपाळकाल्याचा जल्लोष आणि दहीहंडी
यानंतर गोपाळकाला निमित्त शाळेच्या मैदानावर दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक गाण्यांच्या तालावर मानवी मनोरे रचून उत्साहात दहीहंडी फोडली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकजूट, संघभावना, सहकार्य आणि परस्पर विश्वासाचा मोलाचा संदेश देण्यात आला.हा त्रिविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाली.