27.8 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ शिक्षक दिनानिमित्त खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा गौरव

शिक्षक दिनानिमित्त खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा गौरव

0
9
‘१० कोटी नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचा उपक्रम
गोंदिया: भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नार्कोटिक्स विभाग आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘१० कोटी नशामुक्त भारत प्रतिज्ञा महाअभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७० प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. न्यू लक्ष्मीनगर येथील ब्रह्माकुमारी स्वदर्शन भवन येथे आयोजित भव्य सोहळ्यात खासदार राजेंद्र जैन आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या शुभहस्ते त्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या महाअभियानांतर्गत गोंदिया ब्रह्माकुमारी सेवा केंद्र आणि ६ उपसेवा केंद्रांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांमध्ये जाऊन सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांना व नागरिकांना नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली होती. या मोहिमेत मोलाचे सहकार्य करणाऱ्या गोंदिया शहर व ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांचा हा बहुमान करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंदिया क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी रत्नमाला दीदी होत्या. मुख्य अतिथी म्हणून गजेंद्र फुंडे, विजय बहेकार, विनोद हरीणखेडे, केतन तुरकर तसेच ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे पदाधिकारी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना खासदार राजेंद्र जैन यांनी नशामुक्त समाज निर्मितीसाठी शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच या नशामुक्तीच्या अभियानाला अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.