बालवृंदावन शाळेचे स्नेहसंमेलन थाटात

0
20

कोसमतोंडी,दि. 31 -येथील बालवृंदावन पब्लिक स्कूलच्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.संमेलनाचे उद््घाटन जि. प.सदस्या शिलाताई चव्हाण यांच्या हस्ते, केवळराम पाटील काशीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संस्थापक जगदीश येळे, ग्रा.पं.सदस्य जगदीश काशीवार, गौरीताई काशीवार, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील काशीवार, अनिल वैद्य, मुख्याध्यापिका अभिलाषाताई रहांगडाले, संस्था सचिव रितादेवी येळे, प्रा. वाय. एस. रहांगडाले, डॉ. गणूजी काशीवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका रहांगडाले यांनी प्रास्ताविकेतून शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीमाहिती दिली. जगदीश येळे यांनी, विद्यार्थ्यांच्या अंगी सर्जनशिलता वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करून विद्यार्थी हा उपक्रमशील असावा याकरीताशिक्षक व पालकांचे कर्तव्य व भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अनिल वैद्य, गौरी काशीवार, मनोहर पाटील काशीवार, केवळराम पाटील काशीवार यांनी समयोचित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केलेल्या कलागुणांचे उपस्थित मान्यवर, पालक व नागरिकांनी कौतुक केले. त्यानंतर संमेलनातील विविध स्पध्रेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सीमा उरकुडे, पवन यावलकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी चोपलाल रहांगडाले, भोजराज येळे, अश्‍विनी मारवाडे, जियालाल भगत, चंद्रभान झिंगरे, अनिल काशीवार आदी मान्यवर उपस्थित होते.