मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा होणार

0
23

गोंदिया : मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाची एक चमू २९ डिसेंबरला गोंदियात आली. या चमूच्या सदस्यांनी सविस्तर तपासणी व निरीक्षण केले. आता ही चमू आपला अहवाल केंद्रीय शासनाकडे सोपविणार आहे. याच आधारावर गोंदियात मेडिकल कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गोंदियात आलेल्या मेडिकल काँशिल आॅफ इंडियाचे नेतृत्व आसामच्या डॉ. बोस व डॉ. नागेश्वर राव यांनी केले. अचानक ही चमू गोंदियात पोहचली. गोंदिया मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. केवलिया उपस्थित होते.
बाई गंगाबाई महिला रूग्णालयात तयार झालेले नवीन भवन जिथे नर्सिंग प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या संपूर्ण भवनाचे निरीक्षण केले. शेवटी ही चमू कुडवा येथील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्तावित जागेचे निरीक्षण करण्यासाठी पोहचली. तेथील समस्यांच्या बाबत चमूच्या सदस्यांनी माहिती मिळवून घेतली. मेडिकल कॉलेज बांधकामाचे शासकीय जीआरवर नजर घातली. जनिणीचा नकाशासुद्धा बघितला. तिथून परतल्यावर केटीएस रूग्णालयात बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही रूग्णालयात काय व्यवस्था आहेत, कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, किती रूग्ण येतात यावर चर्चा झाली. ही व्यवस्था मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी किती सार्थक ठरेल, याबाबत काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर चमू आपला अहवाल आता केंद्र शासनाकडे सोपविणार आहे. शक्यतो केंद्र शासनाकडून मेडिकल काँशिल आॅफ इंडिया याबाबत रिपोर्ट पाठविण्याची शक्यता आहे.
या चमूने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निरीक्षण केले. केटीएस रूग्णालयाची ओपीडी, आकस्मिक विभाग, आॅपरेशन थिएटर, रूग्णांना भरती करण्याची व्यवस्था, मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीची व्यवस्था पाहिली. केटीएस रूग्णालयाच्या समोरील उघड्या जागेचे निरीक्षण केले. एवढेच नव्हे तर पाणी, जनरेटरची व्यवस्था आहे किंवा नाही, इतर काय-काय व्यवस्था आहेत याची माहिती जाणूण घेतली. केटीएस रूग्णालयाचा नकाशासुद्धा बघितला. यानंतर ही चमू बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गेली. तिथे ब्लड बँकेचे निरीक्षण केले. आॅपरेशन थिएटर, ओपीडी बघितली. किती वार्ड आहेत, खाटांची किती व्यवस्था आहे, किती रूग्ण येतात ही सर्व माहिती मिळवून घेतली.