23.5 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home शैक्षणिक खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक मसुदा समिती स्थापन – शिक्षणमंत्री विनोद...

खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक मसुदा समिती स्थापन – शिक्षणमंत्री विनोद तावडे

0
23

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.21 – राज्यातील अनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन केली असून विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे आ. नागोराव गाणार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अंमलात आणणार असून त्याअनुषंगाने विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमार्फत करण्यात येत आहे, असे तावडे यांनी पुढे सांगितले.

blank