गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 20 वे तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 8, 9 व 10 जानेवारी रोजी शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथे करण्यात आले आहे. यात बुधवार, 8 जानेवारी रोजी उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते, जिप अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4.30 ते 7 वाजतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार, 9 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजतापर्यंत विद्यार्थी, शिक्षक व पालकांकरिता विज्ञान प्रदर्शनीचे अवलोकन व परीक्षकांकडून परीक्षण करण्यात येईल. तसेच सायंकाळी 4.30 ते 7 वाजतापर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 10 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जिप सभापती रमेश अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली व पंस सभापती माधुरी हरिणखेडे यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. याप्रसंगी प्रामुख्याने शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल्ल कचवे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) सुनिल मांढरे, प्राचार्य गोडघाटे, अधिव्याख्याता एल.एन. राऊत, जिप शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी राजकुमार रामटेके, राज्य पुरस्कृत विज्ञान शिक्षक मनोज रहांगडाले, शासकीय तंत्र महाविद्यालयाचे विभाग प्रमुख आर.आर. वाकोटकर, डायटचे प्राचार्य राजेश रूद्रकार, उपशिक्षणाधिकारी बी.बी. पारधी, दीपक आप्तुरकर, बी.एस. देशमुख उपस्थित राहणार आहेत.




