33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home शैक्षणिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे तंंत्रनिकेत महाविद्यालयात उदघाटन

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे तंंत्रनिकेत महाविद्यालयात उदघाटन

0
29

गोंदिया,दि.09ः– जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 20 वे तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य सी.डी.गोडघटे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी प्रफुल कछवे यांच्या हस्ते करण्यात आले.हे प्रदर्शन 8, 9 व 10 जानेवारीपर्यंत शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथे राहणार असून जिल्ह्यातील 8 तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे 48,शिक्षक प्रतिकृती 12 व प्रयोगशाळा सहाय्यकांनी तयार केलेल्या 2 प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाला तंत्र निकेतन महाविद्यालयाचे आर.आर.वाकोडकर,बी.एस.देशमुख,दिपक आप्तुरकर उपस्थित होते.संचालन राज्य पुरस्कृत विज्ञान शिक्षक मनोज रहांगडाले यांनी केले.तर उदघाटन कार्यक्रमाचे आभार श्री पटले यांनी मानले.उदघाटन सोहळ्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी व डायटचे प्राचार्य तसेच उपशिक्षणाधिकारी यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.