धामणगाव रेल्वे,दि.09ःः तालुक्यातील शिदोडी या दत्तकग्राममध्ये संत शंकरमहाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटा द्वारा संचालित शंकरमहाराज कला व वानिज्य महाविद्यालय पिंपळखुटाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराचे आयोजन ३ ते १० जानेवारी २०२० पर्यत करण्यात आले आहे.त्या शिबिरातील बौद्धिक सत्रामध्ये अंजनसिंगी येथील प्रा.दिपक अंबरते यांनी रा.से.यो.आणी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष मुरे हे होते.दिपप्रज्वलनानंतर परमहंस शंकरमहाराज ,कर्मयोगी गाडगेबाबा ,वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार,कवि प्रा.दिपक अंबरते यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रा.अंबरते म्हणाले की,आत्मविश्वास विद्यार्थानी स्वतःमधे निर्माण करावा,स्वतःवर विश्वास ठेवा,नेहमी आनंदी रहा,सकारात्मक विचार करा,या जगात काहीच अशक्य नाही,खरे बोला,ईमानदार रहा,धूम्रपान करु नका,तेच काम करा ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे,दररोज वर्तमानपत्राचे वाचन करा,वेळेच नियोजन करा आदीवर मार्गदर्शन केले.प्रा.नरेश इंगळे यांनी प्रास्तविक केले.यावेळी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.मेघा सावरकर, प्रा.विजय कामडी ,प्रा.सुषमा थोटे,पत्रकार महेन्द्र काळे,ग्रामवासी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.सुत्रसंचालन अक्षय ढोरे यांनी केले तर आभार सुषमा बुराडे हिने मानले.





