36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home शैक्षणिक टेकरी शाळेत दोन दिवसीय बाल आनंद महोत्सवाने फुलवले गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

टेकरी शाळेत दोन दिवसीय बाल आनंद महोत्सवाने फुलवले गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

0
42
गोंदिया,दि.29ःजिल्ह्यातील सर्वात दुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणुन ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील पालांदूर जमी परिसरातील छोटयाशा टेकरी गावातील 16 पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच दि.२५ व २६ जानेवारीला दोन दिवसीय बाल आनंद महोत्सव अतिशय उत्साहात पार पडले.
देवरी पासून ४० किमी अंतरावर असलेल्या व इटीयाडोह च्या पाण्याने वेढलेल्या, पूर्णतः जंगली भाग असलेला, १००% आदिवासी व फक्त ३५० लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या अवघी १६ आहे.एवढ्या कमी पटसंख्येमध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक किंवा कोणतेही कार्यक्रम घेणे कठीण असते. परंतु शिक्षकांचे प्रण व गावकऱ्यांची साथ लाभल्यावर हेच कठीण काम सोपे झाले. या बाल आनंद महोत्सवात माजी शिक्षकांचा  सत्कार, नाविन्यपूर्ण अशा सकाळकालीन अभ्यासिका कुटीचे उदघाटन तसेच माता पालकांची रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.तसेच या कार्यक्रमात संपुर्ण गावाला तसेच पाहुणे, विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.या कार्यक्रमामुळे गावामध्ये दोन दिवस दिवाळी सारखे वातावरण होते व सर्व कष्टकरी गावकऱ्यांचा चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
 उदघाटनीय कार्यक्रमात जि प प्राथमिक शाळा सिरदारटोलाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझिम नृत्य सादर केले. प्रस्ताविकेतून मुख्याध्यापक मोहन बिसेन यांनी आमदार सहसराम कोरोटे यांचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित असलेले सोनु नेताम यांच्या समक्ष शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब पुरवण्याची मागणी आमदारांपर्यंत पोहचविण्याची विनंती केली व शाळा टॅबयुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला.सायंकाळला विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध नृत्य, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पालांदूरच्या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य, विनोदी नाटिका सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातुन स.७.०० वा प्रभात फेरी काढून ध्वजारोहण करण्यात आले.नंतर बक्षीस वितरण कार्यक्रम अभिनव पद्धतीने घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे गावातीलच महिलांना ठेवुन महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.बक्षीस वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व वह्या देण्यात आल्या.उदघाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नुरचंद नाईक उपसरपंच पालांदूर, उदघाटक सोनु नेताम माजी प स सदस्य देवरी, दीपप्रज्वलक शिंदे  पोलीस उपनिरीक्षक मगरडोह,प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रकला कावळे सरपंच पालांदूर, भाष्कर निकोडे माजी सभापती प स देवरी,लन्जे केंद्रप्रमुख,डॉ बेलखोडे, सुरेंद्र गौतम, महानु हुंडरा,कैलास चौधरी, प्रमोद शहारे, नदेश्वर कवास, अमोल नंदेश्वर, मेश्राम, पाऊळझगडे, गावळ, पांडुरंग ठलाल, पांडुरंग उके, शरद पटले केंद्रमुख्याध्यापक, वडगाये ग्रा प सदस्या पालांदूर,पालिवाल ग्रा प सदस्य पालांदूर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रहांगडाले व आभार प्रदर्शन टी एन भेलावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मुख्याध्यापक मोहन बिसेन, केंद्रमुख्याध्यापक शरद पटले, साहाय्यक शिक्षक टी एन भेलावे, एकलव्य शिक्षक मुनेश्वर ताराम, गावातील युवक युवती, शा व्य अध्यक्ष पुरुषोत्तम नाईक व सर्व गावकऱ्यांनी मेहनत घेतली.