आमगाव,दि.३०ः गोंदिया येथील संघी परिवारातर्फे दरवर्षी आमगाव तालुक्यातील प्रावीण्यप्राप्त विद्याथ्र्यांना संघी टॉपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते. यंदा देखील या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी स्व. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त ४ फेब्रुवारी रोजी आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात येणार आहे. प्राविण्यप्राप्त विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.संघी टॉपर्स अवॉर्डकरिता आमगाव येथील फार्मसी परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवून प्रथम आलेली श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी राजश्री पुरणलाल मिश्रा, बी.एड.मध्ये ७५.७० टक्के गुण मिळविणारी श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशनची आचल सुधीर राणे,डी.टी.एड.मध्ये ८५.८० टक्के गुण घेणारी चांदणी हिरालाल बिसेन, आयटीआयमध्ये फीटर शाखेत ८६ टक्के गुण घेऊन प्रथम येणारा श्री लक्ष्मणराव मानकर प्रायव्हेट आयटीआयचा भुमेश पन्नालाल येळे,पॉलिटेक्निकमध्ये ८५.०३ गुण टक्के घेणारा श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा पंकज रतनलाल पारधी, इयत्ता बारावीत ८८.९० टक्के गुण घेणारी विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाची तनू यशवंत मडावी,इयत्ता दहावीत ९५.४० टक्के गुण मिळविणारा आदर्श विद्यालयाचा साहिल गुणीराम बोपचे, बीएस्सीत ८६.१० टक्के गुण घेणारी भवभूती महाविद्यालयाची पूजा मुरलीधर पारधी व एम.एस्सी.मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणारी राधा हितेंद्रकुमार चौरागडे यांचा निवड झाली आहे.या सर्व विद्याथ्र्यांचा ४ फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभात संघी टॉपर्स अवॉर्ड स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी,श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्यूटऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी यांनी केले.





