आमगाव,दि.09- तालूक्यातील जि.प.प्रा.शा. फूकीमेटा येथे वार्षिक स्नेहसम्मेलन शनिवार(दि.8)ला उत्साहात पार पडले.स्नेहसमेलनाचे उद्घाटन आमगाव क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे होते.प्रमूख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य लोकेशभाऊ अग्रवाल,अशोकभाऊ पटले,गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर ,तिगाव केँद्राचे केँद्रप्रमुख के.पी.रहमतकर,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,ग्रा.प. चे सर्व पदाधिकारी , व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक श्रीमती रहाँगडाले मुख्याध्यापिका यांनी केले तर संचालन के.पी.कोठेवार यांनी तर आभार जिंदाकूर यानी मानले.





