38.4 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home शैक्षणिक महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज ८ मार्चपर्यंत पाठविण्याचे आवाहन

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज ८ मार्चपर्यंत पाठविण्याचे आवाहन

0
72

वाशिम, दि. ०५ : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी  https://mahadbtmahait.gov.in  हे  पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जातीविजाभजइमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही ३ ऑगस्ट २०१९ पासून सुरु आहे.

महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेले व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या  अर्जांची शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ८ मार्च २०२० पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्या कार्यालयाकडे पाठवावेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. विद्यार्थ्याचा अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालायाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.