34.2 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home शैक्षणिक सीआरपीएफतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

सीआरपीएफतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

0
65

गडचिरोली,दि.19ः सीआरपीएफ १९२ बटालियनच्यावतीने नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील उपपोलीस स्टेशन पेंढरी येथे सिव्हीक एक्शन कार्यक्रमांतर्गत कमांडंट जियाऊ सिंह यांच्या मार्गदर्शनात द्वितीय कमान अधिकारी प्रभात गौतम यांच्या उपस्थित रुपिनगट्टा व ढोरगट्टा येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
१९२ बटालियन केंद्रीय रिर्जव पुलीस बलाद्वारे जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सिव्हीक एक्शन प्रोग्राम राबवून विविध मुफ्त चिकित्सा शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांच्या माध्यमातून जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहचविण्यात येतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांनासुध्दा शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते. यावेळी १९२ बटालियनचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक कमांडंट अर्पण, शाळेचे शिक्षक व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.