स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
32

अर्जुनी मोरगाव-स्थानिक शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार 26 ऑगस्टला करण्यात आले.प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात ए.पी.आय सोमनाथ कदम,आय क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. के. जे.सीबी आणि आयोजक डॉ. नितीन विलायतकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शिवप्रसाद जयस्वाल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
प्रास्ताविकात प्रा.विलायतकर यांनी महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या प्री.आय.ए .एस कोचिंग सेंटर चे उद्दिष्ट स्पष्ट केले.क्षमता ओळखून वीद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करा.हे स्पर्धात्मक युग आहे.यश प्राप्ती साठी संयम,सातत्य आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करून सहज उद्दिष्ट प्राप्त होऊ शकते. ध्येयपूर्तीच्या मार्गात सामाजिक आर्थिक अडचणी येतात.त्यावर जो मात करतो तो इतिहास रचतो.व्हॉट्सऍप ,फेसबुक, युट्युबचा अतिवापर न करता उद्देश पूर्तीसाठीच या साधनांचा वापर करा असे आवाहन पी.एस.आय कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन हर्षा कापगते,आभार मयुर बोरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शरद मेश्राम, प्रा.द्वारपाल चौधरी , डॉ.भरत राठोड ,मनोज झोडे, सुनीता तवाडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.