उपवनसंरक्षक विरोधात कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0
22

अहेरी–उपवनसंरक्षक आशिष पांडे हे भामरागड वनविभागात रूजू झाल्यापासून येथील कर्मचार्‍यांशी अपमानास्पद आणि खालच्या दर्जाची वागणू देत असल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी आज २६ ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षक पांडे विरोधात एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.
उपवनसंरक्षक आशिष पांडे हे ३ मार्च २0२१ रोजी भामरागड वनविभागात रुजू झाले. रुजू झाल्याच्या दिवसांपासून ते सर्व कर्मचार्‍यांशी अपमानास्पद आणि खालच्या दर्जाची वागणूक देत आहेत. कार्यालयात महिला कर्मचारी देखील असून त्यांच्याशी सुद्धा ते तशीच भाषा वापरत असल्याने आरोपी वनविभागातील कर्मचार्‍यांनी केला आहे. उपवनसंरक्षकांच्या या वागणुकीला कंटाळून चक्क एक महिला लेखापालाने स्वेच्छा नवृत्ती घेतली. यानंतर सुद्धा त्यांचा प्रकोप थांबला नसून कार्यालयाची सुट्टी झाल्यानंतर महिला कर्मचार्‍यांना फोन करून कार्यालयीन कामे सांगायचे आणि रात्रौ उशिरापयर्ंत कार्यालयात काम करण्यास भाग पाडत असल्याचे येथील महिला कर्मचार्‍यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले आहे.
त्यामुळे भामरागड वनविभागातील सर्व कर्मचार्‍यांनी या हुकूमशाह उपवनसंरक्षका विरोधात आज २६ ऑगस्ट रोजी एल्गार पुकारारला होता. गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे या कर्मचार्‍यांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच या उपवनसंरक्षकांची येथून तात्काळ बदली न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा वनविभागातील कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.