
गोंदिया : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 15 ऑगस्ट 2022 ते 02 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत संपुर्ण राज्यात नाविन्यपुर्ण संकल्पना व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर यात्रा तिरोडा तालुक्यात 20 ऑगस्ट गोंदिया, गोरेगाव व आमगाव तालुक्यात 22 ऑगस्ट सालेकसा व देवरी तालुक्यात 23 ऑगस्ट तसेच सडकअर्जुनी व अर्जुनी मोरगांव तालुक्यात 24 ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे. तसेच 12 सप्टेंबर, 2022 रोजी बुट कॅम्प होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक यांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करु शकतात किंवा तालुका स्तरावर प्रचार मोहिमेदरम्यान किंवा जिल्हा स्तरावर सादरीकरण सत्राच्या ठिकाणी नाव नोंदणी करु शकतात. तालुका स्तरावरील प्रत्येक शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये नमुद तारखेला मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे.
तरी या स्टार्टअप यात्रेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व नवउद्योजक यांनी नोंदणी करुन सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. 210, आमगांव रोड, गोंदिया-441601, दुरध्वनी क्र. 07182-299150 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन रा.ना. माटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.