थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे

0
22

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

  गोंदिया दि. 21: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजने अंतर्गत अनुसुचित जातीतील मांग – मांतग व या समाजातील 12 पोट जातीतील लाभार्थी करिता उदिष्ट प्राप्त झालेले असुन इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालय गोंदिया येथे 02 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्यक्ष येऊन रीतसर अर्ज सादर करावे. लाभार्थ्या शिवाय इतर व्यक्ती कडुन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. महामंडळास प्राप्त उदिष्टाच्या आधिन राहुन थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजुरी करण्यात येईल याची लाभार्थीनी नोंद घ्यावी. कर्ज प्रकरण 1.00 लक्ष च्या मर्यादेत मंजुर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा  व्यवस्थापकांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 योजनेतील अटी व शर्ती:- अर्जदार मातंग, मांग, मांग गारुडी व तत्सम 12 पोटजातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रचा राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदाराचे सिबील केडीट स्कोअर 500 असावा. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. 3 लाख यापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.

          अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बैंक खात्याचा तपशिल सादर करावा अर्जदाराने महामंडळाचे प्रचलित नियमानुसार व्यवसायाच्या अनुरुप आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे व करारपत्रे कर्ज मागणी अर्जा सोबत सादर करावे. पुरुष व महिला करिता 50 टक्के आरक्षण तसेच ग्रामिण भागास प्राधान्य राहील. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्तीना प्राधान्य राहिल, सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसांना प्राधान्य राहील. दोन जामिनदार एक शासकिय नौकरदार व एक मालमत्ता धारक त्यांचे मालमत्ते वर महामंडळाच्या कर्जाच्या बोझा नोंद आवश्यक राहील.

          कर्ज वितरणापुर्वी लाभार्थीचे उत्तर दिनांकित धनादेश आवश्यक राहील. या प्रमाणे शासनाने, महामंडळाने ठरवुन दिलेल्या नियम व अटी लागु राहील. कृपया इच्छुक लाभार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पतंगा मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या पत्यावर अथवा किंवा दुरध्वली क्रमांक 07182 – 299216 / 8087448912 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.