जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे १७ मार्चला आयोजन

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

         गोंदिया, दि.25 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था आमगाव, ता. आमगाव जि. गोंदिया येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. ईच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे. इयत्ता १० वी व १२ वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० यावर किंवा उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया रा. ना. माटे यांनी केले आहे.