कोंडी फोडण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवगर्जना अभियानाची घोषणा; नेमकं काय करणार?

0
10

मुंबई – शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा मजबूत पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे तयारीला लागले असून त्यांनी शिवगर्जना अभियानाची घोषणा केली आहे.

पक्षात पडलेली उभी फूट, हातातून गेलेलं राज्यातील सरकार, पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर आलेलं गंडांतर… अशा चौफेर कात्रीत अडकलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता सर्व कोंडी फोडण्याच्या निर्धारानं मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं शिवगर्जना अभियानाची घोषणा केली असून त्या अंतर्गत त्यांचे निष्ठावंत शिलेदार शनिवार, २५ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्हे पिंजून काढणार आहेत.

शिवसेना नेते, उपनेते तसंच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर राज्यातील जनतेशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३ ते शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ पर्यंत महाराष्ट्रात हे अभियान चालणार असून या माध्यमातून राज्य ढवळून निघणार आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत या अभियानाचं नेतृत्व करणार आहेत.

कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी कोणावर?

संभाजीनगर, जालना, बीड, परभणी : अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, किशोरी पेडणेकर, अंकित प्रभू

नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली : संजय (बंडू) जाधव, नितीन बानुगडे पाटील, ज्योती ठाकरे, डॉ. सुजित मिणचेकर, प्रविण पाटकर

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार : अनंत गीते, संजना घाडी, विजय औटी, वरुण सरदेसाई

नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा : या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते खा. श्री. अरविंद सावंत, उपनेते श्री. लक्ष्मण वडले, श्री. अमोल कीर्तिकर, मा. आमदार श्री. शिवाजी चोथे, युवासेना श्री पवन जाधव

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम : चंद्रकांत खैरे, प्रकाश मारावार, हर्षल काकडे, शरद कोळी, दुर्गा शिंदे

बुलढाणा, अकोला, अमरावती : ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे, शुभांगी पाटील, रामकृष्ण मडावी, अनिष गाढवे

नगर, सोलापूर, पुणे : विनोद घोसाळकर, विजय कदम, सुभाष वानखेडे, उल्हास पाटील, साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्फेकर

कोल्हापूर, सातारा, सांगली – संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, लक्ष्मण हाके, बाबुराव माने, विक्रांत जाधव.