कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा,नोंदणी ऑनलाईन करावी

0
16

 गोंदिया, दि.1 : जिल्हयातील मागील एका वर्षात ९० किंवा त्यापेक्षा जास्त दिवस इमारत व इतर बांधकाम स्वरुपाचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी, नुतनीकरण व विविध लाभाच्या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येत असून पात्र बांधकाम कामगारांना अर्ज सादर करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची व मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती मंडळाचे संकेतस्थळ www.mahabocw.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांनी केले आहे.

         पात्र बांधकाम कामगारांना अर्ज व्यक्तिश: ऑनलाईनरितीने नमूद संकेतस्थळावर भ्रमणध्वनी व आधारकार्ड क्रमांकासह भेट देऊन कामगार सुविधा केंद्र गोंदिया (WFC Gondia) हे टॅब निवडून सादर करता येईल. याबाबत काही अडचणी असल्यास कामगार सुविधा केंद्र, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, जिल्हा कामगार सुविधा केंद्र गोंदिया इमारत क्र. ४५, पहिला माळा, बोपचे कॉम्प्लेक्स, बालाघाट रोड, आझाद वार्ड, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे कामगार विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

           कामगार कल्याण मंडळाअंतर्गत ऑनलाईनरित्या नोंदणी व नुतनीकरण करुन देणे तसेच मंडळातील विविध कल्याणकारी योजनाचे आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता कोणतीही खाजगी व्यक्ती, संस्था, संघटना किंवा अनोळखी इसमाकडून नोंदणी, नुतनीकरण करुन देण्याकरीता व विविध योजनांचे आर्थिक लाभ मिळवून देणे, अशा कोणत्याही भुलथापांना व आमिषाला बळी पडू नये. तसेच याकरिता कागदपत्रांची वा पैश्यांची मागणी होत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांचेकडे तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.