काळय़ा बिबटय़ाची शिकार; नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकार,आरोपी ताब्यात

0
129

गोंदिया,दि.01ः- महाराष्ट्रात काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात जुलै २०२१ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात काळय़ा बिबट असल्याचे समोर आले होते.त्या काळ्या बिबट्याची शिकार जानेवारी 23 मध्ये करणाऱ्यां आरोपींना वनविभागाने चार दिवसापुर्वी पकडल्याची पुष्ठी नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील यांनी केली.

डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर ते प्रसिद्ध केल्यानंतर व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व मान्य केले होते.मात्र गेल्या पावणेदोन वर्षांपासून या व्याघ्रप्रकल्पात ठाण मांडून असलेल्या काळय़ा बिबटय़ाला व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना निसर्गाचे हे देणे सांभाळता आले नाही. आणि देवरी तालुक्यातील मंगेझरी व पालांदूर येथील गावकऱ्यांनीच काळय़ा बिबटय़ाचा बळी घेतल्याचे एका प्रकरणाचा तपास करतांना उघ़डकीस आले आहे.त्या आरोपीमध्ये शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे, हे चारही राहणार मंगेझरी ता. देवरी,जि.गोंदिया यांचा समावेश आहे.

हे पण वाचाएनएनटीआर व्याघ्रप्रकल्पाच्या नवेगावभागात आढळला ‘ब्लॅक लेपर्ड’ https://www.berartimes.com/top-news/124268/ via @berartimes

जानेवारी 23 मध्ये त्यांनी फास लावला आणि बिबट फासात अडकला. त्याने स्वत:ला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. फासात अडकूनही तो मरण पावला नाही म्हणून मंगझेरीतील या गावकऱ्यांनी त्याला भाल्याने मारले. १३ जानेवारीलाच ही घटना घडली. तत्पूर्वी १२ जानेवारीला कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आढळले होते.त्याच्या शिकारीची कुणकुण होती. पण कुणीही अवाक्षर काढले नाही. मात्र, खात्यातीलच एका अधिकाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत छडा लावला.त्यांच्या या चौकशीमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्याच्या शिकारीही उघडकीस आल्या असून आरोपींना बेड्या ठोकण्यात आले आहे.

ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले दृश्य

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. या अभयारण्याचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेला होता. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती.