नक्षलग्रस्त भागातील तरुणांसाठी स्वयंरोजगार कार्यशाळा

0
16

अर्जुनी मोर-नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शेतीला कोणतेही पुरक व्यवसाय उपलब्ध नाहीत, बेरोजगारीची समस्या भेडसावत असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने परिसरातील बरेचसे युवक कामाच्या शोधात शहराकडे जात आहेत.
त्यांना जर शेतीला पुरक विविध स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास युवकांना आत्मननिर्भर करता येऊ शकतो या उद्देशाने ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत एकदिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेचे आयोजन २७ एप्रिल रोजी केशोरी पोलिस ठाण्यात करण्यात आले. या कार्यशाळेला केशोरी परिसरातील ४0 बेरोजगार तरूण-तरूणी उपस्थीत होते.
या युवकांना बिओआय स्टार आरसिटी गोंदियाचे विवेक वाहाणे, सतीश झाडे यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धववसाय, गांडुळखत निर्मिती, भाजीपाला लागवड, रोपवाटीका व्यवस्थापन, ब्युटी पार्लर, शिवणकला आदी रोजगाराभिमुख व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे आयोजन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे ठाणेदार सोमनाथ कदम, सहायक पोलिस निरीक्षक जोहेब शेख, पोलिस हवालदार सुशिल रामटेके, दिपक खोटेले, पुनम हरिणखेडे यांनी केले.