बाजार समितीत काँग्रेसचा धुव्वा: लाखनीत युतीचा एकतर्फी विजय

0
7

भंडारा-जिल्ह्यातील भंडारा आणि लाखनी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, सेना (शिंदे) गटाने वर्चस्व निर्माण केले आहे. तर कॉंग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भंडारा येथे दोन्ही गटाला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या असून लाखनीत मात्र युतीने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत ९६ टक्के तर लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९८ टक्के मतदान झाले होते. प्रत्येकी १८ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. मतमोजणीची सर्वांनाच उत्सुकता होती. मतमोजणीअंती भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी आणि सेना युतीला ९ तर कॉंग्रेसला ९ जागा मिळाल्या. तर लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेसला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले तर भाजप-राष्ट्रवादी युतीने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला.
या निवडणुकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांना धक्का बसल्याचे दिसून आले. लाखनी हे नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी कॉंग्रेसची झालेली पिछेहाट चिंताजनक असल्याचे मानले जात आहे. कधी नव्हे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. साम, दाम, दंड, भेदचा वापर या निवडणूकीत करण्यात आला.