२५ जून रोजी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबिराचे आयोजन

0
25
वाशिम,दि.२3 जून – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई च्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिमव्दारे नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय  येथे २५  जुन  रोजी सकाळी १०.३० वाजता “छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात १० वी,१२ वी, पदविका,पदवी नंतर युवक-युवतींना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता विविध रोजगाराच्या संधी, करीअर कसे निवडावे, व्यक्तीमत्व विकास तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
    शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., प्रमुख अतिथी  जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार संजय देशमुख , अनुप धोत्रे ,आमदार किरण सरनाईक,वसंत खंडेलवाल,धिरज लिंगाडे, लखन मलीक, अमित झनक यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे , जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे, विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जोशी,वाशिम करीअर अकॅडमीचे संचालक इस्माईल पठाण, गायकवाड क्लासेसचे संचालक गणेश गायकवाड हे उपस्थित राहणार आहे.सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी केले आहे.