37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home रोजगार/व्यापार तिरोडा येथे 21 मार्चला जिल्हास्तरीय पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

तिरोडा येथे 21 मार्चला जिल्हास्तरीय पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

0
147

blank

 गोंदिया, दि.17 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व श्रीयांश प्रायव्हेट आयटीआय सहकार नगर तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीयांश प्रायव्हेट आयटीआय सहकार नगर, तिरोडा येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 6 कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार असून 550 रिक्त जागांवर भरती करणार आहेत.

       इयत्ता दहावी व बारावी पास, आयटीआय तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रमाणपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

        अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयाचे दूरध्वनी क्र.07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.

blank