
गोंदिया,दि.8: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त प्रतिनिधिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या व सर्वसाधारण योजने अंतर्गत युवती-महिला व पुरुषांकरीता निशुल्क प्रिंटर रिपेरिंग प्रशिक्षण आणि शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १५ जुलै 2025 ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
सर्वसाधारण योजने अंतर्गत खुल्या प्रवर्गातील युवती-महिला व पुरुषांकरीता प्रिंटर रिपेरिंग आणि शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणामध्ये बँकेची कार्यापध्दती, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, प्रकल्प नमुना अहवाल व शासकीय व अनुदानाची माहिती इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता बेरोजगार युवती महिला व पुरुषांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती व प्रवेशाकरिता प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी, गोंदिया संगीता ढोणे संपर्क क्रमांकः ८७८८६४८९६४ व ऑफिस सहायक, एम.सी.ई.डी.,गोंदिया शिशुपाल एम. मानकर संपर्क क्रमांक ९१३०१५००१७ यावर संपर्क करावा. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी, गोंदिया संगीता ढोणे यांनी केले आहे.




