
गोंदिया, दि.25 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करणे व स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल्स गाईड) प्रशिक्षण (Soft Skill Training Programme) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये Basic Training, Advance Training आणि Soft Skill Training या प्रकारच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. Basic Training करीता 200 टूर गाईड्स, Advance Training करीता 100 टूर गाईड्स आणि Soft Skill Training करीता पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योगांमधील सहभागधारक दूर ऑपरेटर, हाऊसकिपींग अटेंडन्ट, फूड अॅन्ड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, इत्यादी संबंधित 150 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेन्ट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. सात दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फ (DoT) प्रमाणपत्र व टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.
*पात्रता निकष :* वय मर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे असावी.
त्यानुषंगाने नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी संबंधित पर्यटन व्यवसायिकांनी सदर प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत सवाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय (DOT), नागपूर यांनी केले आहे.
इच्छुकांनी खालील गुगल लिंकवर दि.31 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
https://docs.google.com/forms/d/e/AfQLS/DMQPEJRZR0p&nGRIKFPAR
ZedUdXgPJygaTXAObQ/viewform?usp=dialog
000000000





