नागझिèयातील वाघ स्थलांतरावर अभ्यासाची गरज

0
15

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.३०- जिल्हा हा नवेगाव न्यु नागझिरा,कोका,नवेगाव पार्क व्याघ्रप्रकल्पासाठी प्रसिध्द होऊ लागले आहे.सध्याच्या घडीला जे काही पाच वाघ व १ वाघिण या ‹व्याघ्रप्रकल्पात आहेत.त्यांची निगा राखण्यासोबतच त्यांच्यासाठी भरपूर अशा आहार व्यवस्थेचा अभाव की इतर नैसर्गिक बांबीचा अभावामूळे स्थलातंरण होते, हे अद्यापही कोडे आहे.गेल्या दोन वर्षात नवेगाव नागझिरा,कोका व्याघ्र प्रकल्पातील चार वाघ इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
या स्थलातंरणावर रोख आणण्यासाठी काही करता येईल काय यासाठी वन्यजीव विभागाने सुध्दा पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.qकवा या क्षेत्रात काम करणाèया वन्यजीव सरंक्षक संस्थासोबत मिळून अभ्यास करण्यासाठी पुढाकार न घेतल्यानेच वाघांच्या स्थलांतरावर उपाय निघू शकलेला नाही.
गेल्या दोन तीन वर्षाचा विचार केल्यास जे काही पाच सहा वाघांनी स्थलातंर केले ते झाले नसते तर १२ ते १५ ची संख्या नागझिरा व्याघ्रप्रकल्पात राहिली असती.आजच्या घडीला कोका व्याघ्र प्रकल्पात ३,नवेगाव र्पाक परिसरात २ वाघ तर नवेगाव वन्यजीव परिसरात १ वाघीण आहे.तर ३ बछडे सुध्दा या परिसरात आहेत.त्यापैकी नागझिरा,न्यु नागझिरा व कोका परिसरात वन्यप्रेमींनी नाव दिलेला डेंडू हा वास्तव्यास आहे.कोका मध्ये अल्फा,न्यु नागझिरा मध्ये टी ४ वाघीण,ओल्ड नागझिरामध्ये माई ,नवेगाव मध्ये टी ६(कॉनी) यांचा वावर आहे.
सन २०१३ च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नागझिरा अभयारण्यातील ङ्कआयातङ्क नावाचा वाघ वाराशिवनीच्या पेंच प्रकल्पाच्या जंगलात निघून गेला. त्यानंतर ऑगस्ट २०१३ मध्ये ङ्कजयङ्क नावाचा वाघ उमरेडच्या करंडला येथे निघून गेला.या जय ने काल रविवारलाच पवनी तालुक्यातील भुयार बीटामध्ये एका गायीची शिकार केली आहे. तर २०१४ मध्ये ङ्कप्रिंसङ्क नावाचा वाघ पेंच येथे निघून गेला. यापाठोपाठ २१ नोव्हेंबर २०१४ ला ङ्कअल्फाङ्क या वाघिणीच्या पोटी जन्मलेली ङ्ककॉनीङ्क ही वाघीण नागझिरातून निघून गेली.ङ्ककॉनीङ्कचा ठावठिकाणा शोधण्यासाठी नागझिरा, नवेगाव व कोका परिसरातील टड्ढॅपिंग कॅमेèयांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी नजर ठेवून होते. अखेर ती नवेगावबांध अभयारण्यात आढळली. ३ डिसेंबर रोजी ङ्ककॉनीङ्क नवेगाव येथील बोंडे रेंजमधील कॅमेèयात कैद झाली.
स्थलांतरनाकडे बघितल्यास नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत असल्याचे मोजणीच्या माध्यमातूनच समोर येत असल्याने प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळत नसावे असा अंदाज वर्तविला जात आहे.तर सोबती शोधण्यास किंवा आपले क्षेत्र ठरविण्यासाठी वाघ बहुधा बाहेर जातात असे वनाधिकांèयाचे म्हणणे आहे.वाघांचे हे स्थलांतर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नागझिरा अभयारण्यात वाघांच्या संवर्धनासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र ङ्ककॉनीङ्कही नवेगाव येथे गेल्यामुळे तेथेही वाघांचे संवर्धन होईल. परंतु नागझिरा व्याघ्र प्रकल्पातीलच वाघ का निघून जातात याचा अभ्यास वन्यजीव वनाधिकाèयांसाठी शोधपुर्ण राहणार आहे.
मात्र नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रपती ,विरू आणि आयात या वाघाचा लहान भावू हा अजूनही बेपता असून मागील तीन वर्षापासून कुठल्याही कॅमेरा ट्रयाप मध्ये आढळला नसल्याने वन्यप्रेमी मध्ये निराशा सुध्दा आहे.

संशोधनात्मक अभ्यासासाठी समनव्याची गरज
जुना नागझिरा अभयारण्या,नवेगाव पार्क,कोका अभयारण्या,नवेगाव न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या घडीला असलेल्या वाघ व वाघिणींच्या संरक्षणासोबतच यापुर्वी येथून स्थलातंरीत झालेल्या वाघांच्या विषयी वन्यप्रेमीमध्ये qचतेचा विषय आहे.त्यांच्या स्थलांतरणाचे मुख्य कारण काय हे कुणीही सांगू शकत नाही,त्यासाठी वन्यजीव विभाग आणि यावर काम करणाèया वन्यजीव स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन विभागाने अभ्यासपुर्ण संशोधन करण्याची खरी गरज आहे.
सावन बहेकार
मानद वन्यजीव रक्षक,गोंदिया

वनमंत्र्याला ताडोब्याशिवाय दिसतच नाही
राज्याचे वन,वन्यजीव व पर्यावरणमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे आजच्या घडीला राज्याचे वन व पर्यटन मंत्री नसून ते फक्त चंद्रपुर जिल्ह्याचेच आहेत की काय असे वाटू लागले आहे.राज्यामध्ये ताडोबाशिवाय इतर व्याघ्रप्रकल्प असताना त्या व्याघ्रप्रकल्पांचा विकास आराखडा त्यांच्याकडे दिसूनच येत नाही.पर्यटनासाठी प्रमोट करायचे तर ताडोबा व्याघ्रप्रकल्प हेच ब्रीद त्यांनी स्विकारल्याने विदर्भातीलच न्यु नागझिरा,उमरेड-कèहांडला सारख्या लहान व्याघ्रप्रकल्पाच्या विकासाला खीळ बसली आहे.मुनगंटीवारांनी वनविभागाच्या एकाही र्बॅँ्रड अ‍ॅम्बेसिडरला या व्याघ्र प्रकल्पात नेण्यासाठी न केलेले नियोजन म्हणजेच वनमंत्र्याला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशिवाय दुसरे नकोच असे झाले आहे.