जनजागृतीने हिवतापाला मिटवु या…..जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण

0
13

25 एप्रिल जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने
गोंदिया- दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस हिवताप आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये “जागतिक हिवताप दिन “म्हणून साजरा केला जातो.हिवतापच्या समूळ उच्चटणासाठी जागतिक पातळीवर अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात.
जागतिक आरोग्य संघटनेने 2008 मध्ये सर्वप्रथम हिवताप दिन म्हणून साजरा केला आहे. सन 2008 पूर्वी 25 एप्रिल हा दिवस ” आफ्रिकन हिवताप दिन “म्हणून साजरा केला जात असे. सन 2007 मध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत हिवातापाचा जागतिक प्रादुर्भाव या विषयावर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित करण्यात आले. परिणामी 25 एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन “म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव सदर परिषदेत मांडण्यात आला. परिषदेच्या ठरावापासून हिवतापाची करणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपयाबद्दल संपूर्ण जगभर सामाजिक जागृती करणे आणि हिवतापाविरुद्ध चालविलेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिक हिवताप दिन साजरा करण्यासाठी उद्दिष्टे ठरवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण आजच्या दिनी माहिती दिली आहे.
जगभरात जवळपास 3000 पेक्षा जास्त डासांच्या प्रजाती आढळून येतात.  भारतात जवळपास 400 डासांच्या प्रजाती आहेत.त्यापैकीच एक म्हणजे अनोफिलिस डास. दुषित अनोफिलिस मादी डास चावल्यास हिवतापाचा प्रादुर्भाव होतो.
मुख्यत्वे भारतात चार प्रकारचे हिवातापाचे आजार दिसून येतात. ज्यात प्लासमॉडियम व्हायवॅक्स, प्लासमॉडियम फॅलसिपेरम, प्लासमॉडियम ओव्हेल आणि प्लासमॉडियम मलेरी. वरील चार पैकी प्लासमोडियम व्हयवाक्स व प्लासमॉडियम फॅलसीपेरम या आजाराचे रुग्ण भारतात जास्त प्रमाणात आढळून येतात. प्लासमॉडियम व्हायवॅक्स च्या तुलनेत प्लासमॉडियम फॅलसीपेरम हा आजार धोकादायक आहे. मादी डासांना प्रजननासाठी मानवी रक्ताची आवश्यकता असते, तर नर डास हे झाड पाल्याचे रस शोषण करून जगतात.
पूर्वी जगभरात आणि भारतात हिवतापाचे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु जागतिक स्तरावरील हिवताप विरोधी जनजागृती, औषधोपचार आणि रक्त नमुने तपासणीचे कामात सुसूत्रता यामुळे या आजारावरील नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. हिवताप रुग्णाचे रक्तनमुने संकलन करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संस्थास्तरावर घेण्यात येते तर गावपातळीवर गृहभेटीदरम्यान प्रत्यक्ष घरोघरी जावुन आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशाताई यांच्यामार्फत होते तर तपासणीचे काम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे करतात आणि दुषित रुग्णांना औषधोपचार देण्याचे काम आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली वैदयकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केले जातात. डासांच्या नियंत्रणासाठी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, थांबलेल्या नाल्याचे पाणी वाहते करणे, टायर, नारळाच्या कवट्या व फुटके डबे इत्यादी मध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.ज्यामुळे डासोत्पत्ती होणार नाही.घरातील वापरात असणाऱ्या भांड्याना आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेऊन कोरडा दिवस पाळला जातो..
घरोघरी ताप रुग्णांच्या सर्वेक्षण करून संशयित रुग्णांची आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशाताई यांच्या  मार्फत रक्तनमुना संकलन करून तपासनीस  हिवताप नियत्रणात सिंहाचा वाटा उचलन्यात येतो.आपला गोंदिया जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व वातावरण डास निर्मिती करीता पोषक असल्याने प्रशासन कितीही प्रयत्नशील असला तरी आपला व नागरिकांचा सहकार्य हिवताप नियंत्रना करीता महत्वाचा असू शकतो.आजच्या दिनी शासनामार्फत पुढिल घोषवाक्य नुसार जनजागृती करण्यात येत आहे.” मलेरियाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठीगतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी “.
-डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, गोंदिया