Home Featured News खा.पवारांच्या अमृतमहोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

खा.पवारांच्या अमृतमहोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

गोंदिया,दि .१६ -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने रेलटोलीस्थित पक्षाच्या कार्यालयात यानिमित्ताने आज १६ डिसेंबरला  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे ,केतन तुरकर,महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,लता रहागंडाले,शहर अध्यक्ष शिव शर्मा,छोटूभाऊ पटले,जिल्हा परिषद सदस्य खुशबू टेंभरे,कुंदन कटारे,खालीद पठाण,जितेश टेंभरे,अशोक शहारे,वासनिक, आशा पाटील,रवि मुंदडा,मोहीत गौतम,प्रतिक भालेराव,शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डाॅ.सुर्वणा हुबेकर यांच्या चमुने रक्त संकलनाचे कार्य केले.तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Exit mobile version