परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे आयोजन ६ फेब्रुवारीला

0
24

सतीश कोसरकर

नवेगावबांध,दि.4- पिंपळगाव-खांबी येथे युगपुरुष युवा मंचच्या सौजन्याने लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडीच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे आयोजन ६ फेब्रुवारीला नामदेवराव ढसाळ साहित्यनगरी, डॉ. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.

सकाळी ९.३0 वाजता सिकलसेल रोगनिदान शिबिराचे उद््घाटन डॉ. कुलदीप बघेले व डॉ. अजय अंबादे यांच्या उपस्थितीत होईल. १0 वाजता भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम होईल. पहिले सत्र सकाळी ११ वाजता, उद््घाटन साहित्यिक दिलवर रामटेके यांच्या हस्ते, प्रा. वैशाली रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अतिथी म्हणून डॉ. ईश्‍वर नंदापुरे, मोरेश्‍वर मेश्राम, उदय चक्रधर, प्रा. संजय मगर, नाशिर जुम्मन शेख, वामन मेश्राम उपस्थित राहतील. 
दुसरे सत्र दुपारी १ वाजता सुरू होईल. यात ‘जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी साहित्य सक्षम ठरले आहे काय? या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश खोब्रागडे राहतील. अतिथी म्हणून डॉ. युवराज मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. विजय मेश्राम, डॉ. प्रदिप भानसे आपले मत व्यक्त करतील. तिसरे सत्र काव्यधारा कविसंमेलनाचे आहे. अध्यक्षस्थानी कवि हरिश्‍चंद्र लाडे उपस्थित राहतील. यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचे कार्यक्रम होईल. 
सदर कार्यक्रमासाठी मुन्नाभाई नंदागवळी, नागसेन मेश्राम, दिपेंद्र उके, अनिकेत डोंगरे, राज शेंडे, सिद्धार्थ शेंडे, महेंद्र गोंडाणे, सावन मेश्राम, कमलेश शेंडे, मिथून रामटेके, निलेश शेंडे, रजनीकांत रामटेके व सर्व मंचाचे कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.