बीजीडब्लू महिला रूग्णालयात रूग्णांच्या आरोग्याशी खेळ 

0
11
मेडिकल वेस्टेज मुळे आरोग्याचे रूग्णालयात वाभाडे
खेमेंद्र कटरे 
गोंदिया,दि.3– एकीकडे देशात स्वच्छ भारत मोहीम हाती घेवून स्वच्छतेला महत्व दिले जात आहे. त्याच धर्तीवर जिल्हा प्रशासन ही स्वच्छतेला महत्व देत आहे. परंतु येथील  सर्वात जुन्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयाकडे बधितल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचे वाभाडे येथील वैद्यकिय अधीक्षकांच्या डोळयादेखत निघाल्याचे चित्र बघावयास मिळते.त्यातच जिल्हाधिकारी यांनी गोंदियासह सर्व पालिका क्षेत्रामध्ये 24 जानेवारीपासून स्वच्छता मोहीम राबविण्याची घोषणा केली.त्यानंतरही शासकीय रुग्णालयामध्ये अशा स्वच्छतेचे दुर्लभ दर्शन रुग्णांना व ड़ाॅक्टरांसह रुग्णांच्या नातेवाईकांना होत असेल तर या रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी स्वच्छतेप्रती किती जागृत अाहेत हे सागांयला येथील काही बोलके छायाचित्र पुरेशे आहेत.तीन चार दिवसापासून अस्वच्छतेमध्ये रुग्ण वेळ कसेबसे तरी काढत बसले आहेत, तरीही सदर वैद्यकिय अधीक्षक आपली बाजू झटकत जिल्हा शल्य चिकित्कांवर दोषारोपण करून रूग्णांच्या वार्डात पसरलेल्या घाणकच-याची विल्हेवाट लावण्या ऐवजी घाणीचे समर्थन करतांना दिसून आले.
बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या सफाई कामगार संस्थेचे कंत्राट आॅक्टोबर 2015 मध्येच संपले. तीन महिने लोटून ही नव्याने निवीदा प्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सकांनी न केल्याने येथील स्वच्छतेचा प्रश्न विकट झालेला आहे. आॅक्टोंबर मध्ये कंत्राट संपल्यानंतर आपल्या स्तरावर मुदतवाढ म्हणून नोव्हे.,डिसेंबर ,जानेवारी 2016 पर्यंत तोंडीस्वरूपात आदेश देवून काम करवून घेण्यात आले. परंतु या तीन महिन्याचेही वेतन सफाई कामगारांना न मिळाल्याने आणि नव्याने करार न झाल्याने  अखेर 1 फेब्रुवारी पासून सफाईकामगारांनी काम बंद केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत या रूग्णालयातील वार्डात रूग्णांच्या औषधीसह रक्ताने माखलेले बेंडेज,कापसांचा ढिगारा  आदी मेडिकल वेस्टेज उघडयावरच पडून आहेत.या मेडिकल वेस्टेज कळे बघितल्यावर माश्यांचा अंबार बघावयास मिळते एकीकडे रूग्ण आपले आरोग्य सुदृढ करण्यासाठी रूग्णालयात येतात परंतु रूग्णालयातच रूग्णांच्या जीवनाशी अस्वच्छतेच्या माध्यमातून खेळ खेळला जात आहे.या रुग्णालयातील खासगी सुरक्षा रक्षकांनाही गेल्या 10 महिन्यापासून मानधन मिळालेले नाही.परंतु जिल्हा शल्य चिकित्सकाने कुठलेही पत्र दिलेले नसतांना सफाईचे काम असलेल्या कंत्राटदारांने बीजीडब्लूमधील स्वच्छतेचे काम बंद पाडलेच कसे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
या संदर्भात गंगाबाई रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ. संजीव दोडके यांना विचारणा केली असता त्यांनी प्रत्येक वार्डात असलेली घाण व अस्वच्छता ही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चुकीच्या नियोजनाचा आणी दुर्लक्षाचा फटका असल्याचे सांगितले. आपण वारंवार लेखी पत्र स्वच्छते संदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सकांना देवून ही त्यांनी या रूग्णांलयाच्या स्वच्छते विषयक कामांच्या कंत्राटा कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आपण आपल्या स्तरावर किती प्रयत्न करणार असे म्हणत रूग्णालयात पसरलेली घाण बघावयास मिळते ,मी काही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
 जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रवि धकाते यांना विचारले असता त्यांनी सदर सफाई कामगार संस्थेने आपल्या स्तरावर सफाईचे बंद केलेले काम हे नियमबाहय आहे. त्यांना काम बंद करण्यासंदर्भात कुठलेही लेखी आदेश दिलेले नसतांना त्यांनी रूग्णालयात अस्वच्छता पसरविण्यात केलेल्या पुढाकाराबद्दल कारणे दाखवा नोटीस देवून नव्याने लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  तसेच त्याच संस्थेकडे के.टी.एस. जिल्हा सामान्य रूग्णालयाचेही काम आहे.तिथे मात्र व्यवस्थित सुरू आहे. यावरून स्थानिक बाई गंगाबाई रूग्णालयतील अधिकारी आपल्या पातळीवर स्वच्छतेकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
 गोंदिया जिल्हाधिकारी डाॅ. विजय सुर्यवंशी यांना विचारणा केली असता या संदर्भात आपल्याला काही ही माहित नाही. मात्र आपण लगेच या संदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सक यांना विचारणा करून रूग्णालयातील घाणीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितले.