34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News मांडोदेवी देवस्थानात आज सामूहिक विवाह सोहळा

मांडोदेवी देवस्थानात आज सामूहिक विवाह सोहळा

0
35

blank

गोरेगाव : तालुक्यातील सूर्यादेवी मांडोदेवी देवस्थान समितीच्यावतीने १५एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल आहे. या सोहळ्य़ात ४0 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. तसेच सायंकाळी ४ वाजता १२५१ कलश विसर्जन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात हजारोच्या संख्येत भाविक व वर-वधू मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात निसर्गरम्य देवस्थान परिसर म्हणून श्री सूर्यादेवी मांडोदेवी देवस्थान नावारुपास आले आहे. या देवस्थानाला दररोज शेकडो भाविक हजेरी लावत असतात. त्यातच चैत्र नवरात्रीच्या पर्वावर या देवस्थानाला यात्रेचे स्वरुपच असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ८ एप्रिलपासून ज्योती कलश स्थापना करण्यात आली आहे.एकूण १२५१ कलश प्रज्वलित आहेत. १५एप्रिल र ोजी सायंकाळी ४ वाजता कलश विसर्जन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २३ वर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाही १५एप्रिल रोजी सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा आयोजित आहे.
या सोहळ्यात एकूण ४0 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान परिसरातील नागरिक, भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष भैयालाल सिंद्राम, सचिव विनोद अग्रवाल, सिताराम अग्रवाल, विश्‍वनाथ असाटी, कुसन घासले, डॉ. लक्ष्मण भगत आदींनी केले आहे.

blank